नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी होणार पूर्वतयारीची बैठक संपन्न


नांदेड  – नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ग्रंथोत्सव 2025 साठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक आज संपन्न झाली.

या बैठकीत विविध क्षेत्रातील साहित्यिक, प्रकाशक व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील परिसंवाद, साहित्य चर्चा, पुस्तक प्रदर्शन, लेखक- वाचक संवाद तसेच इतर सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी ग्रंथोत्सवाची सविस्तर रूपरेषा मांडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, मसापचे सचिव महेश मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे, प्रकाशन संघटनेचे निर्मलकुमार सुर्यवंशी तसेच संजय पाटील, राणा मेटकर, संतोष देशमुख, पुंडलिक कदम, जगदीश धोंड, गोविंद वडगावकर, स्वप्नाली पाठक, ललिता गोणारकर, गंगाधर गोणारकर, गजानन देवसरकर, शिवाजी सुर्यवंशी, अजय वट्टमवार आदी उपस्थित होते. प्रताप सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 104






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *