शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल – VastavNEWSLive.com


बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उप निरीक्षक शिवराज लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, आरोपी शंकर शिवराम मैलारे (वय 35), नबाजी बाबा वाघेकर (वय 34, दोघेही रा. गांधी चौक बिलोली) आणि ज्ञानेश्वर नागोराव करडे (वय 35, रा. बडूर ता. बिलोली) यांनी संगनमत करून शासकीय कामात विघ्न निर्माण केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पोस्टे बिलोली येथे तिघांवर गुन्हा रजि. क्रमांक 63/2026 भादंवि कलम 132, 221, 121(1), 149, 353(5) बीएनएस–2023 अन्वये दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पंतोजी यांच्या मार्फत सुरु आहे.


Post Views: 334






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks