सध्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी त्या त्या मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शिक्षकांची व प्राध्यापकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये सुधाकर कोहळे हे आमचे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी आज विशेषतः शिक्षक प्राध्यापक आणि विद्यापाठ शिक्षक मंच जो आहे, त्या सगळ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम होता. त्यांच्या अडचणी देखील मी ऐकून घेतल्या आणि त्यांना सांगितले की शैक्षणिक क्षेत्रात आमच्या सरकारने सातत्याने आमच्या सरकारने काय कार्य केले आहे. या क्षेत्राला कसे महत्त्व दिले आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती देखील आमच्याच सरकारने सुरू केले आहे. या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगून त्यांना मत मागितली आहेत. आणि मला विश्वास आहे की इथे मोठ्या प्रमाणावर आमच्या उमेदवारला मतदान होईल. दुसऱ्या पसंतीकडे आम्हाला जायची आवश्यकता पडणार नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे मत तर असे आहे की या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीकडे आम्हाला जायची आवश्यकता पडणार नाही. पहिल्या पसंतीचा कोटा निश्चितपणे आमचे उमेदवार पूर्ण करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत गटातटाचे राजकारण महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे बोलले जात आहे, यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की महाविकास आघाडी ही पहिले पासूनच अतिशय विभाजित आहे आणि विशेषतः गटा-तटाचे राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज आम्ही भाजप म्हणून महायुती म्हणून एकसंघपणे काम करत आहोत. विशेषतः नागपूरचा विचार केला, जर ज्या पद्धतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय हे सगळे जे आमचे गट आहेत, मित्र पक्ष आहेत, हे काम करताना आपल्याला दिसत आहेत. तसे काही आपल्याला कॉंग्रेस किंवा त्यांची जी काही आघाडी आहे त्यात मात्र अशा प्रकारचे कुठेही दिसत नाही. पाचही जागा आमच्या महायुतीच्याच निवडून येतील अमरावतीमध्ये महायुतीमध्ये देखील मतभेद दिसून येत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावतीमध्ये किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत. भाजप त्यांच्या पाठीशी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार आहेत, संपूर्ण महायुती त्यांच्या पाठीशी आहे, विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेस. कारण काही भागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य चांगले आहे आणि स्वतः सुनेत्रा वहिनींनी बैठक घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना कामी लावले आहे, शिवसेनेने देखील कामी लावले आहेत. केवळ पुणे जो शिक्षक मतदारसंघ आहे, त्यात आमची मैत्रीपूर्ण लढत चाललेली आहे. त्यात आमच्या बेबनाव आमच्यात नाही. छत्रपती संभाजीनगरला आमचे जे सतीश चव्हाण आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, त्यांच्या पाठीशी शिवसेना आणि भाजप ही पूर्णपणे उभी आहे. त्यामुळे पाचही जागा आमच्या महायुतीच्याच निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अब्दुल सत्तारांच्या भूमिकेवरून एकनाथ शिंदेंना सल्ला दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांच्यासाठी शिवसेनेचे दोन वेगळे गट झाले आहेत. अब्दुल सत्तर यांनी शरद पवार गटाच्या प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की मंत्री संजय शिरसाट यांनी कालच स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही महायुतीसोबत, सतीश चव्हाण यांच्यासोबत आहोत. भाजप तर पहिल्या दिवशीपासून त्यांच्या कामाला लागले आहे. आता एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका मांडली तर ती पक्षाची भूमिका होत नाही. पण माझी अपेक्षा आहे की त्यांच्या पक्षप्रमुखाने देखील याची दखल घेतली पाहिजे की जर सगळे एकत्रित आहेत तर अशी वेगवेगळी भूमिका, वैयक्तिक दृष्ट्या पक्षाच्या नेत्यांनी घेणे काही योग्य नाही. उद्धव ठाकरेंवरही निशाणा उद्धव ठाकरे यांनी रेजिम चेंज संदर्भात विधान केले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर अशी आहे की उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या पक्षाचे रेजिम थांबवू शकले नाहीत. आता ते कोणत्या रेजिम चेंजबद्दल बोलत आहेत ते माहीत नाही. कारण जेव्हा त्यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, तेव्हा त्यांच्याच पक्षात असे वादळ झाले आणि त्याच पक्षातील काही नेत्यांनी खरी शिवसेना तयार केली.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%