काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आले मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठ:गटबाजीची दखल न घेतल्याने कृतीतून दाखवली नाराजी




विधानसभा निवडणूकीसह महापालिका निवडणूकीत नाशिक शहर व जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट होत असतानाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शहरातील त्यांच्या संवाद कार्यक्रमाकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली. या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यावर टिकेची झोड उठवित प्रदेशअध्यक्षांना संघटनाबांधणीसाठी वेळच नसल्याचीही नाराजीही व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. ब्रम्हा व्हॅली महाविद्यालयात आयोजित ब्रम्होत्सवास प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सपकाळ यांनी शहर व ग्रामीण काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी पक्षाच्या अंर्तगत असलेल्या अनुसूचित जाती आघाडी, अनुसूचित जमाती, ओबीसी आघाडी, सेवा दलासह शहातील विवीध फ्रंटलचे प्रमुखांना निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस शहरातून केवळ तीनच पदाधिकारी उपस्थित होते. उर्वरित सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवित एक प्रकारे निषेधच नोंदविला. यामध्ये अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सेवा दलाचे प्रमुख वसंत ठाकूर, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल आदींचा समावेश आहे. प्रदेश अध्यक्षांना संघटना बांधणीसाठी वेळ नसल्यची भावना मनपा निवडणूकीत पक्षाच्या निष्ठावंताना उमेदवारी नाकारत बाहेरून आलेल्या व इतर पक्षांनी नाकारलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यातच अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनीफ बशीर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी थेट शहराध्यक्ष छाजेड व खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात पैसे घेवून उमेदवारी वाटप केल्याचा जाहीर आरोपही केला होता. त्यापाठोपाठ पक्षाचे 10 हून अधिक आजी-माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून दखल घेतली गेली नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षाची झालेली दयनीय अवस्था बघता प्रदेशअध्यक्षांकडून संघटना बांधणीसाठी शहराध्यक्षसह इतर पदांवर फेरबदल करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच येणे नापंसत केल्याने त्यांना संघटनेशी काही देणे घेणे नसल्याचाच आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. नव्या नगरसेवकांनीही मारली सत्काराला दांडी शहरातील एका कार्यक्रमावेळी आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. समवेत खा. शोभा बच्छाव, शरद आहेर आदी. इनसाईड स्टोरी
शहरात आघाडीत लढलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांपैकी केवळ 3 उमेदवारांना यश आले. त्यामुळे या नवनिर्वाचीत नगरसेवक व गटनेते सुफी जीन अशा तीनही नगरसेवकांचा प्रदेशअध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणर होता. मात्र, यापैकीं केवळ एकच महिला नगरसेवकाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *