नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदानावर सार्वजनिक प्रार्थना (नमाज) अदा करण्यात आली आणि एक दुसऱ्याला शुभकामना देवून या सणाचा आनंद साजरा झाला. यात सर्व धर्मिय लोकांनी मुस्लिम बांधवांना ईद उल फित्रच्या शुभकामना प्रेषित केल्या.
मागील महिन्याभरापासून रमजान महिन्यात प्रार्थनेच्या प्रकारांना जास्त प्रमाणात करणे ही आवश्यकता आहे. त्यानुसार मुस्लिम बांधव सकाळी सुर्योदयाअगोदर भोजन करून प्रार्थनेला जात होते आणि नंतर दिवसभर पाण्याचा एक थेंब न पिता दुपारच्या प्रार्थनांना सुध्दा हजेरी लावत होते. सायंकाळी सुर्योदयासह इफ्तार केला जात असे आणि त्यानंतरच्या प्राथर्र्नांमध्ये मुस्लिम समाज सहभागी होतो.
काल चंद्र दिसला आणि आज त्यानुसार ईद साजरी झाली. पहाटे सुर्योदय होईपर्यंत दुकानांवर गर्दी होती आपल्या आवश्यक साहित्यांची खरेदी सर्व लोक करत होते. 9 वाजता सर्व ईदगाह मैदानांवर सामुहिक नमाज पठण झाले आणि त्यानंतर एक दुसऱ्याला शुभकामना देत सर्वांनी या सणाचा आनंद घेतला. त्यानंतर घराघरात शिरकु्रमा बनवून आपल्या मित्रांना, हितचिंतकांना बोलावून गोड पदार्थासह ईद साजरी झाली. प्रशासनाच्यावतीने सुध्दा मुस्लिम बांधवांना सुध्दा ईदच्या शुभकामना देण्यात आल्या. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा सर्व मुस्लिम बांधवांना ईद या सणानिमित्त शुभकामना प्रेषित करत आहे.

Post Views: 139
