अमरावतीत आजपासून पोलिस भरती:एका जागेसाठी 99 उमेदवार, 11 ते 26 दरम्यान कागदपत्रांची पडताळणी‎




अमरावती ग्रामीण पोलिस दलासाठी बुधवारी ११ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरु होत आहे. वेगवेगळ्या संवर्गातील २१४ जागा या माध्यमातून भरल्या जाणार असून तब्बल २१ हजार २०६ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. एकूण अर्ज आणि जागांची संख्या लक्षात घेतल्यास एका शिपायासाठी ९९ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. ही भरती प्रक्रिया आगामी २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून दररोज पहाटे ५ वाजतापासून उमेदवारांच्या शारिरिक क्षमता चाचण्या घेतल्या जातील. प्रतिदिन सुमारे ८०० उमेदवारांची चाचणी घेण्याचे नियोजन पोलिस विभागाने केले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयामागील जोग स्टेडियम स्थित पोलिस कवायत मैदानात ही चाचणी होईल. महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई पदभरती २०२५-२६ अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिस दलासाठी २१४ उर्वरित. पान ४ भरती प्रक्रियेसाठी नियमावली जाहीर या भरती प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची संख्या ६९ आहे. शिवाय महिलांची संख्या ६४ असून खेळाडू १०, प्रकल्पग्रस्त १०, भूकंपग्रस्त ४, माजी सैनिक ३१, अंशकालीन पदवीधर १०, पोलिस पाल्य ६ आणि गृहरक्षक दलाच्या जवानांची संख्या १० अशा प्रवर्गनिहाय पदांचा समावेश आहे. उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, प्रवर्ग प्रमाणपत्रे, भरतीचे ओळखपत्र, पासपोर्ट आणावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks