करंजवणसह भुयारी गटार योजनेची कामे मुदतीत व दर्जेदार पूर्ण करा:मनमाडचे नगराध्यक्ष पाटील यांच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना‎



करंजवण पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजनेची कामे मुदतीत, जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाची पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अधिकाऱ्यांना दिल्या. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन क

.

मनमाड नगरपालिकेत नगराध्यक्ष पाटील यांच्या दालनात मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह नगरसेवक, संबंधित अधिकारी, करंजवण पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अधिकारी आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दोन्ही योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड शहरासाठी करंजवण पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आल्या असून, करंजवण पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात आले असून, उर्वरित नागरिकांनीही तातडीने नळ जोडणी करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष पाटील यांनी केले. यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी कमी होतील, असे त्यांनी सांगितले.

भुयारी गटार योजनेच्या कामांबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची दखल घेत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. गटारीचे पाईप टाकताना काँक्रीट रस्त्यांना कटरने कट करणे, खोदकामानंतर निघालेल्या मातीची योग्य विल्हेवाट लावणे, तसेच गटारीसाठी बांधण्यात येणारे चेंबर दर्जेदार बांधून त्याचे आवश्यक क्युरिंग करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्ण दाबाने पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करंजवण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेली उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. तसेच विविध प्रभागांतील अडचणी, पाणीपुरवठा व आरोग्यविषयक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *