बांधकामस्थळावरून साहित्य चोरी: अल्पवयीन बालकही ताब्यात:अमरावती गुन्हे शाखेने 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला




बांधकामस्थळावरून साहित्य चोरी करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ईश्वर किशोर भोसले (२०, रा. मोगरा पारधी बेडा) असे आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, चवरे मार्केट परिसरात दोन व्यक्ती चोरीचे केबल वायरचे बंडल घेऊन बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने चवरे मार्केट परिसरातून ईश्वर भोसले आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले आणि प्रभात पोकळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *