मराठवाड्यातील लेखकाचा गौरव:मनोज बोरगावकरांच्या 'नदीष्ट'ला गुजरात साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार जाहीर




लोक वाचत नाहीत हा समज मोडीत काढत मराठीमध्ये जवळपास दोन डझन आवृत्त्या निघणाऱ्या मनोज बोरगावकर यांच्या सुप्रसिद्ध अशा नदीष्ट कादंबरीला गुजरात साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार जाहीर झालाय. गुजरात सरकारच्या गुजरात राज्य साहित्य अकादमी, क्रीडा, युवा आणि संस्कृती विभागाने या पुरस्काराची घोषणा केलीय. गुजराती भाषेतील लेखिका, संशोधक डॉ. उर्वशी मनुप्रसाद पंड्या यांनी अतिशय ओघवत्या शैलीत या कादंबरीचा गुजरातीमध्ये अनुवाद केलाय. नदीष्टला अनुवादासाठी हा दुसरा पुरस्कार मिळालाय. या कादंबरीचे यापूर्वी हिंदी आणि कन्नड भाषेमध्ये अनुवाद झालेत. ही वाचकप्रिय कादंबरी 2019 मध्ये ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीय. कादंबरीचे प्रचंड स्वागत मनोज बोरगावकर यांची नदीष्ट ही कादंबरी नदी, पर्यावरण व एलजीबीटी समूह ह्या आजच्या जागतिक स्तरावरील समस्यांचा वेध घेते. निसर्ग, माणूस व त्यांचे अद्वैतभाव ती प्रकर्षाने दृग्गोचर करते. नदीष्टला आशय, विषय आणि रुपबंधाच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीमुळे उदंड वाचक प्रेम तर लाभलेच. सोबतच राज्य शासनाच्या हरी नारायण आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाच्या पाच लाखांच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कारानेही नदीष्ट कादंबरीचा गौरव झाला आहे. बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते लेखक मनोज बोरगावकर व नदीष्टचे हिंदी अनुवादक डॉ. गोरख थोरात यांचा सन्मान करण्यात आलाय. यात लेखकाला 3 लाख आणि अनुवादकाला 2 लाख रुपये देऊन गौरवण्यात आले आहेत. ऑडिओ बुकही आले नदीष्ट ही बहुचर्चित कादंबरी स्टोरीटेल इंडियाने ऑडिओ बुक स्वरूपातून आणली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या अभिवाचनातून साहित्यप्रेमी वाचक हा ठेवा उपलब्ध झाला आहे. या ऑडिओ बुकचे मुखपृष्ठ नीलेश साठे या कलावंताने केले आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर आणि स्टोरीटेल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचा व ऐका” या योजनेचा शुभारंभ व नदीष्ट ऑडिओ बुकचे प्रकाशन झाले आहे. बोरगावकर यांची पुस्तके – अकथ कहाणी सद्गुणांची (ललित) – कोरा कागद निळी शाई (कवितासंग्रह) – नदीष्ट (कादंबरी) – पाश्चिमात्य विचारप्रवाह – लोकप्रशासन – स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह आजवर मिळालेले पुरस्कार – अच्युतबन पुरस्कार – आपटे ग्रंथालय पुरस्कार, इचलकरंजी – कविवर्य टिळक पुरस्कार – कालिदास पुरस्कार – राय हरिश्चंद्र साहनी ‘दुःखी’पुरस्कार – महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम प्रौढ कादंबरी पुरस्कार संबंधित वृत्त नदीष्ट पर्व गुजरातीमध्ये:साहित्य अकादमीकडून कादंबरीचा अनुवाद प्रकाशित; मनोज बोरगावकरांच्या लेखणीला मानाचे पान कलेचा मान:बोरगावकरांच्या ‘नदीष्ट’ला 5 लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान; बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते गौरव लेखकाचा गौरव:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला 5 लाखांचा पुरस्कार; राष्ट्रभाषा सन्मानाच्या अंतिम फेरीत धडक मानाचे पान:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला ‘सावाना’चा पुरस्कार; मंगळवारी नाशिकमध्ये अच्युत गोडबोले यांच्या हस्ते गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks