निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरकडे शांततामय व संविधानिक मार्गाने जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने गुरुवारचा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळला. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असून, लोकप्रतिनिधींशी केलेले अमानुष वर्तन हा लोकशाही आणि संविधानाचा अवमान असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला. ‘उत्तरदायित्व’ हे लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत मूल्य आहे. निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांना रोखणे आणि त्यांच्यावर पोलिस बळाचा वापर करणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. लोकप्रतिनिधींवर झालेला हल्ला हा जनतेच्या आवाजावर झालेला हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, नगरसेवक रफिक शेख, खजिनदार चंद्रशेखर कपोते, भाऊसाहेब आजबे, राजाभाऊ कदम, इंटकचे अध्यक्ष चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
राहुल गांधींसह खासदारांवर लाठीचार्ज:काँग्रेसचे पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन; 'लोकशाहीसाठी काळा दिवस' पाळला