![]()
हडपसर पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी, स्पा मालकीण आश्र्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन यांच्यासह दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बाबु लोणकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मगरपट्टा सिझन मॉलसमोरील द कॉस्मो पॉलिस बिल्डिंगमध्ये ‘द फॉरेवर’ नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. याबाबतची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पुष्टी झाल्यानंतर हडपसर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत तीन पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर आपली उपजीविका भागवत होते, असे समोर आले आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत. मौजमजेसाठी वाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, तीन दुचाकींसह रिक्षा जप्त मैाजमजेसाठी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी, रिक्षा, तसेच मोबाइल चोरणाऱ्या अल्पवयीनाला काळेपडळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन दुचाकी, एक रिक्षा, मोबाइल असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अल्पवयीनाने हडपसरमधील काळेपडळ, तसेच राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरातून दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.दुचाकी चोरणारा अल्पवयीन उंड्री परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तपासात त्याने तीन दुचाकी, एक रिक्षा, तसेच मोबाइल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
हडपसरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय:तीन तरुणींची सुटका, मालकीण आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल
