खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तुलजेश यादव यांचे निधन


नांदेड (प्रतिनिधी)  – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नांदेड येथे सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी म्हणून कार्यरत असलेले  तुलजेश गणेशलाल यादव (मंडले चौधरी) (वय ४४), रा. बालाराम यादव नगर, वजीराबाद, नांदेड यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे शासकीय वर्तुळात, यादव समाजात तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

यादव हे मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि समाजाभिमुख अधिकारी म्हणून परिचित होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत अनेक लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांशी त्यांनी जपलेले स्नेहपूर्ण संबंध हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात होते.

त्यांच्या अकाली निधनामुळे यादव (मंडले चौधरी) परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना ओळखणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी तसेच मोठा आप्तपरिवार असा विस्तृत परिवार आहे.

तुलजेश यादव यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या निजनिवासस्थान, बालाराम यादव नगर, वजीराबाद, नांदेड येथून निघणार असून, त्यानंतर गोवर्धन घाट, नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.


Post Views: 191






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *