Purva Kaushik Video Viral; Actress Emotional Over NEET Protest Lathicharge


‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता मनोरंजन क्षेत्रातही उमटू ल

.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तर काहींवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. या घटनेनंतर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली असून पूर्वा कौशिकनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.

व्हिडिओमध्ये भावुक झालेली पूर्वा कौशिक म्हणाली, “मला कधीच वाटलं नव्हतं की मी असा व्हिडीओ करेन. मी या प्रकारची व्यक्ती नाही. पण काही गोष्टी आता सहन होत नाहीत. खूप हतबल वाटतंय. आपण काहीच करू शकत नाही, माणसं मरतायत, काय चाललंय हेच कळत नाही. लोकशाही असलेल्या देशात हे घडत आहे, ही खूप वेदनादायक बाब आहे.”

तिने पुढे सांगितले की, “माझा हा व्हिडीओ पाहून काही जण म्हणतील की एवढं रडायचं काय आहे किंवा हा दिखावा आहे. पण मनातलं कोणाशी बोलायचं? इन्स्टाग्रामवर किती सपोर्ट दाखवायचा? आपण दोन वेळचं जेवतो, आपलं आयुष्य जगतो; पण आपल्यासाठी काही लोक रस्त्यावर उतरून लढत आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, हेच कळत नाही.”

‘हे सगळं थांबवा, माणसाची किंमत इतकी कमी आहे हे माहीत नव्हतं’

पूर्वा कौशिकने सरकार आणि संबंधित यंत्रणांना आवाहन करत म्हटले की, “जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर थांबवा. माणसाची किंमत इतकी कमी झाली आहे, हे मला माहीत नव्हतं. जबाबदारीची जाणीव शून्य झाल्यासारखी वाटते. ही परिस्थिती बदलली पाहिजे.”

दिल्लीत नेमकं काय घडलं?

‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने संसद मार्चचे आवाहन केले होते. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, तर लाठीचार्ज झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता.

‘संसद मोर्चा’त ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आल्याचे CJP ने जाहीर केले; त्यानंतर पोलीस मुख्यालयाबाहेर सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले की, “आम्ही आता सरकारकडे जाणार नाही. जर त्यांना चर्चा करायची असेल, तर सरकारने जंतर-मंतरवर यावे.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. वांगचुक २८ जूनपासून उपोषणावर आहेत; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मंगळवारी त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा…

विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही:लाठीचार्जच्या निषेधार्थ मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर जाणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *