राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून मोठे विधान केले आहे. रोहित पवार यांनी एमपीएससी आयोगातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत, तसेच नितेश राणे यांना थेट महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. एमपीएससीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार: रोहित पवारांचा आरोप एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना रोहित पवार यांनी आयोगातील भ्रष्ट कारभारावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आयोगातील काही सदस्यांनी पेपर फोडून जवळपास हजार-दीड हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केली आहे. माझी आणि विद्यार्थ्यांचीही इच्छा आहे की त्यांनी रस्त्यावर न उतरता अभ्यास करावा, मात्र सरकार जाणीवपूर्वक वेगळे आंदोलन उभे करत आहे.” एमपीएससी आयोग बरखास्त करण्याऐवजी या भ्रष्ट सदस्यांवर विश्वासू अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून त्यांना निलंबित किंवा बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली. नितेश राणेंना मविआत येण्याची ऑफर काल भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार हे ‘शत्रू नसून मित्र आहेत’ असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी मोठी राजकीय गुगली टाकली. राणेंच्या विधानाचे स्वागत करत पवार म्हणाले, “राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, विचारांमध्ये भिन्नता असू शकते. मला वाटते की, नितेश भाऊ कदाचित भविष्यात भाजपमध्ये राहणार नाहीत. त्यांनी भाजप सोडला आणि ते आमच्याबरोबर आले, तर येत्या काळात आम्ही नक्कीच एकत्रित मंत्री म्हणून काम करू शकतो. रोहित पवार एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. काय म्हणाले होते नितेश राणे? दरम्यान, काल नितेश राणे यांनी पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. रोहित पवार हे आपले मित्र असल्याचं सांगत राणे म्हणाले की, ते चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणतात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण दोघांनीही एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, ‘रोहित पवार कदाचित उद्या माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्री असतील’, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण राजकीय वक्तव्य किंवा टीका करण्यासाठी आलेलो नसल्याचंही राणे यांनी स्पष्ट केलं. सविस्तर वाचा हेही वाचा.. दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसामध्ये- दिपके:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट महाराष्ट्र आणि दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसात आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार आणि भीमनवार यांचे राजीनामे होतील. देशाच्या भविष्यासाठी आपण लढा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे हटू नका. जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना केले. सविस्तर वाचा
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%