पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे एमएस-सेट परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागांतर्गत ही परीक्षा अमरावती शहरात घेतली जात आहे. यासाठी एकूण ३२ केंद्र निश्चित करण्यात आली असून, ९ हजार ८१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रांमध्ये शहरातील विविध महाविद्यालये आणि शाळांचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तीन दिवस आधी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. कल्पना जावळे (९४२००३४३८५) यांच्याशी संपर्क साधावा. यामुळे त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था करणे सोपे होईल. इतर विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनाही डॉ. जावळे यांच्याशी संपर्क साधता येईल, असे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सांगितले.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%