![]()
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या घटकांचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन या सोहळ्यास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण आ. सतीश चव्हाण यांनी कवी सुनील उबाळे यांना दिले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.
कोडकौतुक:कवी सुनील उबाळे यांना 'लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार' जाहीर; 25 जुलै रोजी होणार गौरव
