अजित पवारांसह तरुण क्रू मेंबरचाही दुर्दैवी अंत:अजितदादांशी आज बोलणे करून देणार होती, पण…; पिंकीच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला




महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी धडकली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पायलट, एक क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा समावेश आहे. यात पिंकी माळी या तरुण क्रू मेंबर युवतीचा मृत्यू झाल्याने माळी कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. यावेळी कुटुंबीयांनी लेकीची शेवटची आठवण सांगितली आहे. अजित पवार यांच्यासह विमानात क्रू मेंबर असलेल्या पिंकी माळी या तरुणीचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. पिंकी ही दररोज आपल्या कुटुंबीयांशी बोलायची. जसा वेळ मिळेल तसा मेसेज तरी करायची. पण आज तिने काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांना भीती वाटली आणि त्यांना वाटणारी भीती खरी ठरली. लेकीच्या आठवणी सांगताना माळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पिंकी माळीचे वडील हे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वी पिंकी आपल्या वडिलांचे अजित पवारांशी बोलणे करून देणार होती. परंतु काही कारणास्तव ते राहून गेले. पुन्हा आजच्या प्रवासात पिंकी अजित पवारांशी वडिलांचे बोलणे करून देणार होती. पण त्याआधीच काळाने घाला घातला आणि होत्याचे नव्हते झाले. अजित पवारांसह पिंकीचाही या अपघातात मृत्यू झाला. पिंकीचे संपूर्ण नाव कर्तु शिवकुमार माळी असे असून ती मुंबईत राहत होती. अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले चार जण कोण?:देशाने अद्वितीय प्रतिभा गमावल्या बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सहकारी विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचा समावेश आहे. विमानातील क्रूमध्ये कॅप्टन सुमित कापूक आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *