पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन – VastavNEWSLive.com
नांदेड (प्रतिनिधी) -दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुजरातमधील कुबेर येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते.
अत्यंत संयमी, मितभाषी आणि सर्वसमावेशक पत्रकार म्हणून गेल्या २० वर्षांपासून संजय बुडकेवार माध्यम क्षेत्रात कार्यरत होते. दैनिक प्रजावाणीमध्ये उपसंपादक पदावर गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करीत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी पत्नी व मुलीसोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी ते गुजरातमध्ये गेले होते. आज दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता गुजरातमधील कुबेर येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा पार्थिव देह गुजरातमधून नांदेड येथे रात्री उशिरा आणण्यात आला असून, दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दिवंगत पत्रकार संजय बुडकेवार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने वृत्तपत्र सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Post Views: 137