विधवा महिलेवर नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस असलेला युवक सन 2015 पासून अत्याचार करीत आहे
नांदेड(प्रतिनिधी)-एका विधवा महिलेला आपल्या जाळ्यात ओढून एका युवकाने तिचे तीन गर्भ पाडायला लावले. दरम्यान तो युवक पोलीस झाला. त्यानंतर चौथ्या गर्भाच्यावेळे महिलेने तो गर्भ पाडला नाही आणि आज दोन वर्षापासून ती अनेक उंबरठे झिजवत आहे. आज त्या महिलेने पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या समक्ष आपला अर्ज मांडला आहे. आता तरी तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
शारदा संतोष सरोदे ही सिडको येथील रहिवासी महिला आहे. तिच्या पतीचे 2013 मध्ये अपघाती निधन झाले. त्यावेळेस वैभवनगर हडको येथे राहणारा युवक प्रशांत गंगाधर गजभारे सोबत शारदा सरोदेची ओळख झाली. काही दिवसात रोजचे बोलणे प्रेमात बदलले. तरी शारदा सरोदेने सांगितले की, माझे दोन मुले आहेत. तेंव्हा प्रशांत गजभारेने मी तुझ्या सोबत लग्न करेल असे आश्र्वासन दिले आणि तिच्यासोबत शरिर संबंध स्थापित केले. आपले संबंध कोणाला सांगितले तर मुलांना मारुन टाकेल अशी भिती दाखवली. 2017 ते 2019 दरम्यान शारदा सरोदे दोनवेळेस गर्भवती झाल्या. प्रशांतने ते गर्भ पाडायला लावले.
सन 2022 मध्ये प्रशांत गजभारे आपल्या वडीलांच्या जागी पोलीस खात्यात अनुकंप तत्वावर पोलीस अंमलदार या पदावर रुजू झाले. धुळे येथे प्रशिक्षण पुर्ण करतांना सुध्दा मला तेथे बोलावले. आधार कार्ड पाहुन लॉज मालक रुम देत नव्हता. तेंव्हा त्याने मालका पटवून रुम घेतली. पुढे 15 एप्रिल 2022 रोजी पंढरपुर येथे बंदोबस्त करत असतांना मला तेथे बोलावले आणि तेथे सुध्दा माझ्यासोबत अत्याचार केला. लॉज मालक रुम देत नाहीत म्हणून जान्हवी प्रशांत गजभारे नावाचे आधार कार्ड सुध्दा बनवले. ते आधार कार्ड लॉजवर रुम मिळण्यासाठी तयार केले होते. पुढे तिसऱ्यांदा गर्भवती राहिले. तो ही गर्भ मला पाडायला लावला. पण संबंध सुरूच राहिले. चौथ्यांदा मी गर्भवती झाले तेंव्हा 7 महिन्याची गर्भवती असतांना तो म्हणाला मुल होवू दे मग मी माझ्या घरच्या मंडळींना सांगून तुझ्यासोबत लग्न करून घेईल. मुलीचा जन्म झाला. त्यानंतर मात्र त्याने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये प्रशांतची आई, भाऊ आणि मामा हे सुध्दा माझ्यावरच लाच्छन लावून मलाच दोषी ठरवत आहेत. माझ्यावर 2015 पासून सुरू असलेल्या अन्यायाला वाच्या मिळावी म्हणून मी अनेक जागी उंबरठे झिजवले आहेत. पण मला यश आले नाही असे शारदा सरोदे वास्तव न्युज लाईव्हला सांगत होत्या. आज त्यांनी आपला अर्ज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्याकडे दिला असून आपली कथा सादर केली आहे. आता तरी त्यांना नक्की न्याय मिळेल अशी त्यांना आशा आहे.
Post Views: 1