27 डिसेंबरला झालेल्या मारहाणीबद्दल पोलीसांनी आता वृत्तलिहिपर्यंत दखल घेतलेेली नाही
नांदेड(प्रतिनिधी)-27 डिसेंबर रोजी रात्री वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर झालेल्या हल्याची दखल आज वृत्तलिहिपर्यंत तरी पोलीस विभागाने घेतलेली नाही.
कवालजितसिंघ जोगासिंघ या युवकावर 27 डिसेंबर रोजी रात्री एका व्यक्तीने जिवघेणा हल्ला केला. त्या हल्यात त्याच्या डाव्या पंजातील करंगळी जवळ एवढी मोठी जखम झाली आहे की, त्याची करंगळी कधी तुटून पडेल असे वाटते. त्याच्या काही नातलगांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही यशोसाई हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहोत. अशा पध्दतीने कोणी रुग्ण आला असेल तर त्या दवाखान्यातील प्रशासन सर्वात अगोदर पोलीस विभागाला सुध्दा कळवते. यशोसाई हे हॉस्पीटल नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे आणि घटना वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आता कोणी कोणती जबाबदारी निर्वहन करावी यासाठी तर पोलीसांची एसओपी चालेल ना.
आज कवालजितसिंघच्या काही नातलगांनी सांगितले काल पोलीसांनी आम्ही येणार आहोत असे सांगितले. काही नातलग सांगत होते एक पोलीस येवून कवालजितसिंघचा जबाब घेवून गेला आहे. पण अद्याप तरी अर्थात वृत्त लिहिपर्यंत त्या संबंधाचा एफआयआर कवालजितसिंघ किंवा त्यांच्या नातलगांना प्राप्त झालेला नाही. म्हणजे यदा-कदा या युवकाचे बरे वाईट झाले तर त्याचा जबाबदार कोण? हा प्रश्न कोणाला विचारावा आणि त्याचे उत्तर कोण देईल. एवढी ताकत आमच्यात सुध्दा नाही.
कवालजितसिंघला लागलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर परवापासूनच व्हायरल झालेला आहे.