येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात खंडेरायांची देवस्वारी उत्साहात संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)-आज वेळ आमावस्याच्या मुहूर्तावर माळेगाव येथे भगवान खंडेरायांची देवस्वारी निघारी आणि पुर्ण गावभर फिरून पुन्हा मंदिरात प्रस्थापित झाली.
दरवर्षी वेळ आमावस्याच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील खंडेरायाची यात्रा असते. विशेष करून पारधी समाजामध्ये या यात्रेला खुप महत्व आहे. नांदेडच्या माळेगावसह मध्य प्रदेशातील एका गावात आणि चंद्रपुर येथे होणाऱ्या या तिन यात्रेमध्ये पारधी समाज अनेक निर्णय घेतात.त्या निर्णयांना पुढच्या यात्रेत चर्चा करून त्याचे काय झाले. यावर पुन्हा चर्चा होते. पण मागील काही वर्षापासून हा निर्णयांचा प्रकार बंद झालेला आहे.
आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास म्हाळसाकांत यांची देवस्वारी मंदिरातून बाहेर निघाली. यात्रेतील सर्व रस्त्यांनी फिरून ती स्वारी पुन्हा मंदिरात प्रस्थापित झाली. भाविकांनी बेल भंडारा, बतासे उडवून खंडेरायांचे दर्शन घेतले. वाजत-गाजत निघालेली ही देवस्वारी अत्यंत गर्दीच्या रस्त्यातून सुध्दा पुर्णपणे सुरक्षीतता ठेवून चालते.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे आणि अनेक अधिकारी आणि असंख्य पोलीस अंमलदारांनी देवस्वारीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला.