ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पूर्णेकर यांना गंभीर अवस्थेत कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळ असलेल्या इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कार्यालयातच झाला हल्ला प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा परिसरातील गणेश नगर येथे त्यांच्या कार्यालयात असताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती आहे. पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हा हल्ला राजकीय कारणातून झाला की अन्य कोणत्या वादातून, याबाबतही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी पूर्णेकर यांना लक्ष्य का केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महापालिका निवडणुकीशीही संबंध प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते. ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मधून त्यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही याच पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला होता. जयनाथ पूर्णेकर हे ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबाचा ठाण्यातील स्थानिक राजकारणाशी संबंध राहिला आहे. ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर दरम्यान, ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता राजकीय पक्षाच्या विभागप्रमुखावर गोळीबार होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर हल्लेखोरांचा शोध घेऊन हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट करण्याचे आव्हान आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हेही वाचा…. जिल्हा बँकेच्या बैठकीला निलेश लंके यांना निमंत्रण नाही:बाळासाहेब थोरातांच्या बैठकीवर खासदार नाराज, म्हणाले ‘मला बोलवायला हवे होते’ अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांची संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा…
ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार:दोन राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू