राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेसाठी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क घेऊ नये, अशा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार परीक्षा आवेदनपत्रे शुल्क न घेता ऑनलाइन भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सवलती मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे. या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्रे भरून घ्यावीत, असे सांगण्यात आले आहे. शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने सूचना राज्य मंडळाकडून या संदर्भातील सविस्तर सूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच सर्व विभागीय मंडळांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या निर्णयाची तातडीने माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या निर्णयानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया शासनाच्या निर्देशांनुसार केली जाणार आहे. आधीच शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय? दरम्यान, अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊन 10वी आणि 12वीचे परीक्षा फॉर्म भरून घेतले आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काबाबत पुढील कार्यवाही कशी करायची, याबाबत राज्य मंडळाच्या सविस्तर सूचनांकडे आता लक्ष लागले आहे. राज्य मंडळाकडून पुढील आदेश आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर याबाबतची प्रक्रिया स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी राज्य मंडळाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा…. बीडमध्ये कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचा वडिलांवर गोळीबार:गावठी बंदुकीतून फायरिंग, आरोपी फरार गेवराई शहरात कौटुंबिक वादातून सावत्र मुलाने वडिलांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय नगर परिसरात सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता हा प्रकार घडला. गोळी गुडघ्याला लागल्याने शेख मुसा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गोळीबार करणारा सावत्र मुलगा मंगेश धुराजी शिंदे फरार आहे. सविस्तर वाचा…
दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी:फेब्रुवारी-मार्च 2027 च्या परीक्षेसाठी शुल्क न घेण्याचे राज्य मंडळाचे निर्देश