इंडिगोचे विमान मुंबईत उतरलेच नाही:सव्वा तास हवेत घिरट्या, सुरत विमानतळावर प्रवासी तासन्‌तास अडकले



दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामान आणि जोरदार टर्ब्युलन्सचा फटका बसला. मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिकूल हवामानामुळे विमानाला सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे वैमानिकाने विमानाला सुमारे सव्वा तास हवेत घिरट्या घालाव्या लागल्या. मुंबईत लँडिंगसाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे विमान सुरत विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आले. अखेर विमानाचे सुरत विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सव्वा तास हवेतच विमान दिल्लीहून मुंबईकडे येत असताना विमान मुंबईच्या हवाई हद्दीत पोहोचले होते. मात्र त्यावेळी खराब हवामान आणि हवेत तीव्र झोके जाणवत असल्याने लँडिंगमध्ये अडथळे निर्माण झाले. वैमानिकाने मुंबई विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती सुरक्षित नसल्याने विमानाला काही काळ हवेतच फेऱ्या माराव्या लागल्या. सुमारे सव्वा तास विमान हवेत घिरट्या घालत राहिल्यानंतर अखेर ते मुंबईऐवजी सुरतकडे वळवण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरत विमानतळावर प्रवासी अडकले विमान सुरत विमानतळावर उतरवण्यात आल्यानंतरही प्रवाशांच्या अडचणी संपल्या नाहीत. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजेपर्यंत विमान सुरत विमानतळावरच उभे होते. त्यामुळे विमानातील प्रवाशांना अनेक तास सुरत विमानतळावरच थांबावे लागले. मुंबईला पोहोचण्याच्या अपेक्षेने दिल्लीहून निघालेल्या प्रवाशांना खराब हवामानामुळे अचानक सुरतला उतरावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. विमान पुन्हा मुंबईकडे कधी रवाना होणार, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, मुंबईतील खराब हवामान आणि टर्ब्युलन्समुळे विमानाचे लँडिंग पुढे ढकलावे लागल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमान सुरतला डायव्हर्ट करण्यात आले. हेही वाचा… दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी:फेब्रुवारी-मार्च 2027 च्या परीक्षेसाठी शुल्क न घेण्याचे राज्य मंडळाचे निर्देश राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेसाठी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क घेऊ नये, अशा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *