![]()
गट, गणांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सिल्लोड वगळता इतरत्र भाजप-शिवसेनेत युतीची घोषणा झाली होती. पण, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (२१ जानेवारी) पैठण, कन्नडसह फुलंब्रीत पक्षाकडून ऐनवेळी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे युतीची घोष
.
पैठणला शिवसेना (शिंदे गट) व भाजपची युती होऊन भाजपला बिडकीनची एकमेव जिल्हा परिषदेची जागा देण्यात आली, मात्र बुधवारी भाजपने चार एबी फॉर्म दिल्याने तीन वाजेनंतर आलेले एबी फॉर्म घेऊ नये, यासाठी शिवसेनेचे पाचोडचे जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवराज भुमरे, भूषण कावसानकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाला. काही काळ अर्ज भरण्याची प्रतिक्रिया थांबली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद टळला. ऐनवेळी भाजपकडून दत्तात्रय गोर्डे यांनी नवगाव गटातून उमेदवारी अर्ज भरत भाजपचा एबी फॉर्म जोडला. शिवाय विहामांडवा येथील उमेदवारालाही भाजपचा एबी फार्म देण्यात आला होता. भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट म्हणाले, शिवसेना-भाजपची युती झाली असून एक जागा भाजप लढत आहे. आज चार एबी फॉर्म दिले. मात्र युती तुटलेली नाही. शिवसेनेचे आ. विलास भुमरे यांनी सांगितले की, अधिकृत भाजपची यादी व एबी फॉर्म कुणाला दिले हे समोर आल्यानंतर युतीवर भाष्य करू. दोन्ही राष्ट्रवादी घडाळावर लढणार जिल्ह्यात ४१ गट, ८५ गणांत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित उमेदवार दिले. हे सर्व घडाळ चिन्हावर लढणार आहेत.
फुलंब्री | काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने वरून पाथ्रीकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज भरला. तर, काँग्रेसच्या आजीनाथ सोनवणे यांनी खामगाव गणातून तुतारी हे चिन्ह घेतले आहे, तर भाजपचे खामगावचे सरपंच मनोहर सोनवणे यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी फुलंब्री तहसील कार्यालय परिसरात झालेली गर्दी.
