हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये महिलांनी घेतली बालविवाह निर्मूलनाची शपथ:घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रम‎



घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार (दि. २०) रोजी महिला पालकांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध प्रकारच्या स्पर्धांनी हळदी-कुं

.

शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका रुपाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत संक्रांती सणाचे महत्त्व सांगितले व उपस्थित मकर संक्रांतीच्या भगिनींना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानिमित्त उपस्थित माता-पालकांसाठी खास नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व महिलांना वाण म्हणून सुंदर आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बालविवाह निर्मूलनाची शपथही उपस्थितांकडून घेण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी सोनवणे, आस्था परदेशी यांनी केले तर आभार सविता पवार यांनी मानले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविका व गावातील महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शालेय आठवणी पुन्हा अनुभवता आल्या : शाळेने आयोजित केलेला हळदी-कुंकू कार्यक्रम अतिशय आनंददायी होता. संगीत खुर्ची, खेळ यामुळे आम्हाला आमच्या शालेय आठवणी पुन्हा एकदा अनुभवता आल्या. शाळेचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे पालक स्वाती गुळवे यांनी सांगितले.

संगीत खुर्चीत सविता ठोंबरे प्रथम, मोरे द्वितीय या वेळी महिलांसाठी संगीत खुर्ची हा मनोरंजक खेळ घेण्यात आला. या स्पर्धेत प्रथम सविता योगेश ठोंबरे, द्वितीय योगिता गणेश मोरे तर तृतीय सोनू विलास मोरे यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांनी खो-खो खेळात उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. खो-खो स्पर्धेतील विजेत्यांनाही शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *