सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

0
240_177747836369f22adb05778_shenkhathd.jpg




खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून, एका ट्रॉलीचा दर तब्बल ५ हजारांवर पोहोचला आहे. पशुधन घटल्यामुळे उपलब्धता कमी झाली असली तरीही शेतकरी दीर्घकालीन फायद्यासाठी शेणखतावरच भर देत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर रब्बी हंगाम संपताच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची खरीपपूर्व तयारी जोरात सुरू झाली आहे. काढणीची कामे पूर्ण झालेल्या शेतांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेणखत टाकण्याची लगबग दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी नैसर्गिक खतांवर भर देताना दिसत आहेत. सुपीकतेसाठी शेणखताला प्राधान्य शेणखतामुळे मातीचा पोत सुधारतो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता होते आणि जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. त्यामुळे रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखत अधिक उपयुक्त असल्याचे शेतकरी मानतात. याच कारणामुळे अनेक शेतकरी वर्षभर साठवलेले शेणखत ट्रॅक्टरद्वारे शेतात नेऊन पसरवत आहेत. खरीपपूर्व तयारीला वेग शेणखत टाकण्यामुळे जमिनीची ताकद वाढून खरीप हंगामातील पिकांना चांगला पाया मिळतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या उत्साहात शेतांची पूर्वतयारी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र सुरू असलेली ही लगबग आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांची सकारात्मक तयारी दर्शवते. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता जपण्याची जाणीव यामुळे शेणखताला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. खर्च वाढला असला तरी दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने शेतकरी शेणखताचा वापर प्राधान्याने करत असल्याचे स्पष्ट होत आहे. जयराज जिवरग,म्हणाले की माझ्याकडे ९ते १० गायी-बैल आहेत. वर्षभर त्यांच्या पालनातून मिळणारे शेणखत उन्हाळ्यात विकतो. सध्या एका ट्रॉलीला पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहे. ट्रॉलीचा दर पाच हजारांवर पूर्वी गावागावात पशुधन मुबलक असल्यामुळे शेणखत सहज उपलब्ध होत होते. मात्र, सध्या पशुधनाची संख्या घटल्याने शेणखत मिळवणे कठीण झाले आहे. परिणामी त्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सध्या एक ट्रॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी सुमारे ५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मोजावा लागत आहे. त्यामुळे काही शेतकरी इतर गावांतून शेणखत खरेदी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed