![]()
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयोजित ‘जैवविविधता सर्वेक्षण व पक्षी गणना’ शिबिर उत्साहात पार पडले. या सर्वेक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नाशिकमध्ये पहिल्यांदा
.
या उपक्रमाबाबत माहिती देताना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू म्हणाले की, आरोग्य विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून निसर्ग संवर्धनासाठीही तितकेच सजग आहे. या शिबिराच्या माध्यमातून संकलित केलेला वैज्ञानिक डेटा पर्यावरण साक्षरता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तर, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे यांनी या उपक्रमाला शाश्वत भविष्याकडे टाकलेले एक पाऊल असल्याचे सांगत, पक्ष्यांचा अधिवास टिकवणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
50 प्रजाती आणि 270 पक्ष्यांची नोंद अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीचे सल्लागार सतीश गोगटे यांनी सांगितले की, या सर्वेक्षणात सुमारे 50 प्रजातींचे 270 पक्षी आढळून आले आहेत. विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसोबतच कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचीही मोठी जैवविविधता आहे. या पक्षीगणनेची सर्व माहिती ‘ई-बर्ड’ (e-Bird) या जागतिक ॲपवर अद्ययावत करण्यात आली असून, ती जगभरातील अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या प्रसंगी विद्यापरिषद सदस्य डॉ. अजित फुंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांसह विद्यापीठाचे कर्मचारी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्मिळ ‘ह्युम्स वॉर्बलर’ सारख्या पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे नाशिकच्या जैवविविधतेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी विद्यापीठ परिसरात पक्षीनिरीक्षणाच्या सर्वेक्षण मध्ये पारवा, भारद्वाज, पाकोळी, टिटवी, लहान बगळा, ढोकरी, शिकाऱ्या, दलदल हरीण, घार, वेडा राघू, खंड्या, तांबट, पहाडी पोपट,लहान निखार, हळद्या, सुभग, नाचण, कोतवाल, स्वर्गीय नर्तक लांब शेपटीचा खाटीक, कावळा आणि त्यांच्या वैभवशाली शेपटीसह असंख्य मोर असे सुंदर पक्षी दिसले.
या उपक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या शिबिरामध्ये सतीश गोगटे, मनिष गोडबोले, गणेश वाघ, गंगाधर आघाव, रोहित मोगल, पद्मजा ओतुरकर, सिमा तंगडपल्लीवार, चारुशिला शुक्ल आदी पक्षीमित्र सहभागी झाले होते.
