कोरड्या दुष्काळात आता पिण्याच्या पाण्याच्या गंभीर संकटाची चाहूल, जिल्ह्याच्या प्रकल्पांमध्ये केवळ 58 टक्केच जलसाठा उरला‎



दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काही दिवसात सर्वत्र धो-धो पाऊस बरसला नाही तर पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी, ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी या मोठ्या व मध्यम प्रकल्पासह ४१ लघु प्रकल्पातील २८ सप्टेंबर रोजीचा जलसाठ्याची टक्केवारी ही केवळ ५८.५२ आहे. तर गतवर्षी याच तारखेपर्यंत म्हणजे या प्रकल्पातील पाण्याची एकूण टक्केवारी ९४.७४ टक्के होती. गत वर्षीची व यंदाची प्रकल्पातील जलसाठा ही येणाऱ्या काळातील पाणी टंचाईची चाहूल आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान खात्याने व काही हवामान अभ्यासकांनी वर्तवला होता. तो अंदाज जिल्ह्यात एकूण पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून खरा ठरला आहे. आज जवळपास पावणेदोन महिने उलटून गेले तरी जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस पडलाच नाही. सप्टेंबर महिन्यात ४ ते ५ दिवस पडलेला पाऊस सर्वत्र पडलाच नाही. जिथे पडला तेथे पावसामध्ये जोरच नव्हता. त्यामुळे जमिनीची भूक पण भागली नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या आरंभापासून सूर्य देवता आपले उग्ररूप दाखवत आहे.यामुळे जिल्हाभरात उन्हाळ्यासारखे ऊन तापू लागल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे होत असलेले बाष्पीभवन व त्यात प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पाण्याची उचल ही दोन मुख्य कारणे प्रकल्पातील जलसाठा कमी होण्या मागची आहे. यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या अखेर व जुलै महिन्यात जो धुंवाधार पाऊस बरसला त्यानंतर पाऊसच न झाल्याने या प्रकल्पाची जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. कधी-कधी आभाळात काळे ढग जमा झालेले दिसून येतात.आता पाऊस येतोच असे वाटत असताना सुटणाऱ्या हवेमुळे हे ढग इतरत्र जात असल्याने पावसाचा एकही थेंब पडत नाही, अशी सध्या स्थिती झाली आहे. पावसाळ्यात उन्हाचे चटके निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे.याची प्रचिती जिल्हावासियांना गत एक ते दीड महिन्यापासून येत आहे. सध्या पावसाचे दिवस असतांना पाऊस न पडता उन्हाळ्यासारखे ऊन तापत आहे. एवढेच नव्हे तर उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्प दलघमीमध्ये टक्केवारी नळगंगा ६२.३०० ८९.८७ खडकपूर्णा ९३.४०४ १०० पेनटाकळी ५८.८१७ ९८.८ ज्ञानगंगा ३३.९३० १०० मस १५.०४० १०० कोराडी १५.१२० १०० पलढग ७.५१० १०० मन ३६.६०० ९९.३८ तोरणा ७.८९० १०० उतावळी १९.७९० १०० ४१ ल. प्रकल्प ८९.८८० ८६.७५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *