अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून (मंगळवार, २९ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया ६ ऑक्टोबरपर्यंत चालेल. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि ४ ऑक्टोबरला रविवारची सुटी असेल. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन झाला आहे. अपर आयुक्त संजय जाधव यांच्या नेतृत्वात तहसीलदार श्याम देशमुख टीमसह कामकाज सांभाळतील. खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये, तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम निश्चित केली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवर ‘नोटा’चा पर्याय नसतो. उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर मर्यादा नाही. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील ५६ तहसीलदार, २७ एसडीओ आणि इतर अधिकारी या निवडणुकीत विविध जबाबदाऱ्या सांभाळतील.
विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून नामांकन:अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार