Shirur Ex-MLA राजेंद्र गावडे Joins BJP



पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिरूरचे माजी आमदार राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे आणि शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष

.

या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आमदार राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे आणि धर्मेंद्र खांडरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत आहे. तसेच, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान सरकारमुळे महाराष्ट्रात भाजपला भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र, पक्ष नेतृत्वाने नेहमीच दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे भाजपचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *