पाल येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा शुभारंभ:शेतकऱ्यांचे प्रश्न व मूल्यांच्या समस्या यावर सविस्तर विचार




फुलंब्री | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न “अ’ दर्जा प्राप्त डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालय, पाथ्री यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष सातदिवसीय शिबिराचे उद्घाटन पाल येथे झाले. शिबिराचे उद्घाटक डॉ. सी. एम. काळे ( राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) होते, तर अध्यक्षस्थानी मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ पाथ्री संस्थेचे अध्यक्ष द्वारकादास पाथ्रीकर होते. द्वारकादास पाथ्रीकर यांनी शाश्वत विकासासाठी युवा पाणलोट व्यवस्थापन तसेच पडीत जमीन विकास शेतकऱ्यांचे प्रश्न व मूल्यांच्या समस्या यावर सविस्तर विचार मांडले. तरुणांनी अभ्यास केला पाहिजे, श्रम केले पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत तसेच संशोधन केले पाहिजे अशी परखड भूमिका द्वारकादास पाथ्रीकर यांनी मांडली. संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजय बोचरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. वसंत घुले यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. विनोद वावचने यांनी केले. कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य प्रा. ज्ञानेश्वर पाथ्रीकर, प्राचार्य कल्याण आपटे, प्रा. गजानन वाहेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *