![](https://nandedlive.com/wp-content/uploads/2024/10/Gharfodi.jpg)
मुखेड मध्ये शिक्षकाचे घर फोडले – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड गावातील दिपनगर भागात राहणाऱ्या एका शिक्षकाचे घरफोडून चोरट्यांनी त्यातून 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
मुखेड येथील शिक्षक दादाराव गोविंदराव आगलावे आणि त्यांच्या शिक्षक पत्नी दोघे 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता शाळेत गेले आणि दुपारी 1 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडलेला होता. घरात ठेवलेल्या कपाटातील सोन्याचे दागिणे 66 हजार रुपये किंमतीचे आणि 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 387/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 82