ग्रामीण खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद- सिरसाट




प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोत्यात पळणे, दोरीवर उड्या, रिले, रस्सीखेच, गोळा फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. विद्यार्थ्यांनी मशाल घेऊन संचलनाद्वारे पाहुण्यांना सलामी दिली. स्पर्धा अग्नी हाऊस, पृथ्वी हाऊस, आकाश हाऊस आणि जल हाऊस या गटांमध्ये पार पडल्या. डॉ. सिरसाट यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद आहे. शालेय जीवनात खेळांना महत्त्व दिल्यास हे खेळाडू देशाचं नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, वंदना चव्हाण, भाग्यश्री नरोडे, वंदना कैतके, सोनाली लबडे, शीतल नरोडे, किरण राजपूत, प्रियांका काळवणे, समीर शेख, दत्तू काळवणे, योगेश देवबोने, शिवनाथ चव्हाण, गजानन राऊत यांनी मेहनत घेतली. सिध्दनाथ वाडगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. यात धावताना मुली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *