![]()
जनमतच्या एक्जिट पोलनुसार मुंबईत सत्तापालट होणार असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच शिवसेन ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाला 62 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कॉंग्रेस-वंचितला 20 तर इतरला 7 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष होते. याच महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ठाकरे बांधूंच्या सभांना लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. परंतु, एक्जिट पोल वेगळे आकडे दाखवत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरीचा देखील एक्जिट पोल समोर आला असून इथे देखील भाजपला जास्त मते मिळत असल्याचा अंदार ‘प्राब’ने वर्तवला आहे. प्राबने दिलेल्या आकडेवारीनुसार पिंपरीमध्ये भाजपला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शरद पवार गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला शून्य, मनसेला एक तर वंचितला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘प्राब’नुसार पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, कॉंग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे. हे वृत्त आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत
ठाकरे बंधूंना जोरदार धक्का!:मुंबईत सत्तापालट होणार, भाजप-शिवसेना सत्तेत येणार; वाचा महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल
