![]()
अतिवेगामुळे दुचाकीवर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे दुचाकी लिंबाच्या झाडाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवाची घटना कन्नड-चापानेर रस्त्यावरील बनशेंद्रा गावानजीक माजी सरपंच रफिक पटेल यांच्या वस्तीजवळ रविवारी (दि. ११) रात्री घडली. यात कन्नड साख
.
रतन दिवेकर याच्या चुलत बहिणीच्या मुलीचे वैजापूर येथे लग्न होते. त्यासाठी रतन दिवेकर हा आपला शेजारी व जिवलग मित्र शुभम सोनवणे याला दुचाकीवरून (एमएच २० जीटी ७६३०) सोबत घेऊन गेला होता. लग्न लावून ते कन्नड येथे परतत होते. दरम्यान, अतिवेगामुळे दुचाकीवर नियंत्रण मिळाले नसल्याने ती लिंबाच्या झाडाला धडकली. एकाचा देह लिंबाच्या झाडात फसला. एक जण शेतात फेकला गेल्या. रस्त्याच्या कडेला लांब फेकले गेलेले असल्याने या दोघांकडे कोणाचेही रात्रभर लक्ष गेले नाही. सोमवारी (दि. १२) सकाळी सात वाजता अंगणवाडी कर्मचारी अपघातात मृत्यू पावलेला रतन दिवेकर हा अविवाहित व आईस एकुलता एक होता. तो कारखाना येथील अपना हॉटेलमध्ये कामास होता. त्याच्या पश्चात आई आणि एक बहीण असा परिवार आहे. तर शुभम सोनवणे याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तो कारखाना येथे विश्वकर्मा गॅरेजला कामास होता. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी असा परिवार आहे. कन्नड कारखाना स्मशानभूमीत सोमवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची कन्नड शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी दिली. सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गेलो. या वेळी लिंबाच्या झाडात एक मृतदेह अडकलेला होता. दुसरा मृतदेहही बाजूलाच होता. हे विदारक चित्र पाहून मी पोलिसांना फोन लावला. रुग्णवाहिकेला फोन करून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. {रफिक पटेल, माजी सरपंच, बनशेंद्रा शोभा बोर्डे यांनी हे दृश्य पाहिले. त्यांनी तत्काळ बनशेंद्रा गावचे माजी सरपंच रफिक पटेल यांना माहिती दिली. दरम्यान, शिर्डीला जात असलेल्या भाविकाने अपघातग्रस्तांना ओळखले. माजी सरपंच पटेल यांनी तत्काळ कन्नड शहर पोलिस ठाण्याचे जमादार आटोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवली. या दोघांना उचलून कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मोतिंगे यांनी दोघांना मृत घोषित केले.
एक मृतदेह लिंबाच्या झाडाला अडकलेला
