कसबा गणपतीला वैशाख मासानिमित्त चंदन उटी, विविध फुलांची सजावट:ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

0
10f24bab-ef2b-4aed-a76d-4edc80e8774f_1777464479809.jpg




वैशाख महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मोरयाला चंदन उटी चा लेप लावून पूजा करण्यात आली. तसेच मोगरा, चाफा, जरबेरा, कमळ, गुलाब, जास्वंद, मांदार आदी फुलांची सजावट यावेळी करण्यात आली होती. मूळ रूपातील जयती गजाननाचे स्वरूप डिसेंबर २०२५ मध्ये सर्व भाविकांसमोर आले. त्या प्रथमच अशा प्रकारचे चंदन उटी लेपन सोहळा करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, विश्वस्त संगीता जयंता ठकार, मिहिर ठकार, आशापुरक ठकार उपस्थित होते. सध्या उन्हाच्या झळांनी सर्वत्र बिकट अवस्था होत आहे. त्यामुळे चंदन उटी म्हणजे शीतलतेचा प्रसाद आणि पूजेमध्ये वापरली गेलेली सुवासिक फुले म्हणजे भक्तीचा सुगंध असा दुहेरी योगाचा लाभ यानिमित्ताने भाविकांना घेता आला. श्री जयति गजाननाचे डोळ्यांचे पारणे फेडणारे असे अतिशय मनमोहक रूप आणि पुष्प सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उन्हाळ्यात थंडावा मिळावा आणि उष्णतेपासून शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी चंदनाचा लेप लावला जातो. चंदन अतिशय शीतल आणि सुगंधी असल्यामुळे हा लेप लावून मोरयाला प्रसन्नता मिळते. चंदन लावणे हे देवाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र पूजा मानली जाते. वे.मू. वसंत चिंतामणी फडके गुरुजी, श्री नृसिंह सरस्वती पाठशाळा आळंदी तर्फे मंदिरात सायंकाळी ऋग्वेदाच्या १४ घनपाठी ब्राह्मणांद्वारे घनाच्या ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन केले होते. या महान कार्याला येऊन ब्रम्हणापतीसूक्त श्रवणाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed