Fire Destroys Papaya Fruit Amravati Cotton Market Loss | अमरावती कॉटन मार्केटमधील फळ बाजारात आग: पपईसह अनेक फळे जळून खाक, मोठे नुकसान – Amravati News



कॉटन मार्केटमधील शेडमध्ये ठेवलेल्या फळांना अशी आग लागली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

अमरावती येथील जुन्या कॉटन मार्केटमधील फळ बाजारात शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत पपईसह अनेक फळे जळून खाक झाली, ज्यामुळे पाच ते सात फळ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

.

शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या शेडमध्ये ही घटना घडली. येथे ठेवलेल्या पपईच्या ढिगाला आग लागली. बहुतेक फळ उत्पादकांनी आपली फळे येथे ठेवली होती, ज्यात पपईचा सर्वाधिक भरणा होता. कागदात गुंडाळलेली आणि प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवलेली अनेक फळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या ज्वाळा दिसताच तेथील दुकानदारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या बंबाने आग लवकर आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील मोठा धोका टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *