[ads1]
![]()
विरार परिसरातील कळंब बीचवर फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणाचा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. सत्य विश्वकर्मा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या भावासोबत कळंब बीचवर आला होता. समुद्राच्या चॅनेलमध्ये निर्माण झालेल्या वेगवान ‘रिव्हर्स करंट’मध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्य विश्वकर्मा हा आपल्या भावासोबत नालासोपारा येथून खाडी रानगाव परिसरातील कळंब बीचवर फिरण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास तो समुद्राच्या पाण्यात उतरला. याचवेळी समुद्रातील पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. खाडीच्या चॅनेलमध्ये वेगवान उलटा प्रवाह निर्माण झाल्याने सत्यला त्यातून बाहेर पडता आले नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता सत्य समुद्रात उतरलेला असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ‘रिव्हर्स करंट’ म्हणजे किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांमधील पाणी पुन्हा समुद्राच्या दिशेने वेगाने खेचले जाणे. अशा प्रवाहाचा अंदाज न आल्यास पाण्यातील व्यक्तीला स्वतःला सावरणे कठीण होऊ शकते. याच प्रवाहामुळे सत्य समुद्राच्या दिशेने वाहून गेला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सत्य पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या भावाने तातडीने मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनाही या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अर्नाळा सागरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे शोधकार्य घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस तसेच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता सत्यचा शोध घेण्यासाठी समुद्रातील पाण्याच्या भागासह किनारपट्टीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी आणि पाण्याची स्थिती लक्षात घेऊन शोधकार्य केले जात आहे. सत्यचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरू आहे. पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाण्यात उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः भरतीच्या काळात, खाडीच्या चॅनेलजवळ किंवा पाण्याचा वेग अधिक असलेल्या ठिकाणी समुद्रात उतरणे धोकादायक ठरू शकते. समुद्र शांत दिसत असला तरी पाण्याखालील प्रवाहाचा वेग अचानक वाढू शकतो. दरम्यान, सत्य विश्वकर्मा याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू असून, या घटनेमुळे कळंब बीच परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… ‘विरोधकांना सुबुद्धी येवो, कुबुद्धीचे विसर्जन होवो’:गणरायाकडे मुख्यमंत्री फडणवीसांची खास मागणी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा देताना राजकीय विरोधकांवरही मिश्कील टिप्पणी केली. सविस्तर वाचा…
[ads2]
विरारच्या कळंब बीचवर 24 वर्षीय तरुण समुद्रात बेपत्ता:‘रिव्हर्स करंट’मुळे वाहून गेल्याची शक्यता, शोधमोहीम सुरू
















Leave a Reply