बिहारमध्ये दहावीची विद्यार्थिनी विनवणी करत होती; गुंड ओढत राहिले:व्हिडिओही बनवला, रस्त्यावर अश्लील कृत्य, सहकाऱ्याला मारहाण; 3 दिवसांनंतर तिघे ताब्यात

[ads1]

  • Marathi News
  • National
  • A 10th Grade Student In Bihar Was Begging; Goons Kept Dragging Her, Even Made A Video, Committed Obscene Acts On The Street, Beat Up A Colleague; Three Arrested After 3 Days

पाटणा54 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बिहारमध्ये निर्भय गुंडांच्या क्रूरतेची घटना समोर आली आहे. जमुई जिल्ह्यातील मडवा पहाडी भागात १९ सप्टेंबरच्या संध्याकाळी १० वीची विद्यार्थिनी आणि तिच्या सहकाऱ्याला घेरून गैरवर्तन करण्यात आले. कोचिंगवरून परतणाऱ्या दोघांना काही तरुणांनी अडवले. विद्यार्थिनीला मारहाण केली. तिला ओढले आणि अश्लील कृत्य केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवण्यात आला. या दरम्यान विद्यार्थिनी विनवणी करत राहिली, पण त्यांना पाझर फुटला नाही. सुमारे अर्धा तास चाललेल्या या घटनाक्रमानंतर तिथे पोहोचलेल्या एका गावकऱ्याने त्यांना वाचवले.

२१ सप्टेंबर रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. पीडितांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. एसडीपीओ दीप्ती मोणाली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. तीन आरोपींना पकडले असून तिघेही अल्पवयीन आहेत.

राहुल म्हणाले- लज्जास्पद, किरकोळ घटना : जदयू

या घटनेवरून विरोधी पक्षाने म्हटले की बिहारमध्ये गुंडाराज आहे. सत्ताधाऱ्यांनी हे फेटाळले. जदयूचे प्रदेशाध्यक्ष उमेशसिंह कुशवाहा म्हणाले, ‘छोट्या-मोठ्या घटना घडत असतात.’ मात्र, दोषींना कडक शिक्षा होईल.. राहुल गांधी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

पूर्वीच्या घटनांनीही केले लाजीरवाणे २०२५-२६ | नवादा : ककोलतमध्ये महिलांशी छेडछाड. २०२३ | बक्सर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. २०१८ | जहानाबाद : मुलीचे रस्त्यावर कपडे ओढले. २०१८ | सुपौल : शाळा वसतिगृहात ३४ विद्यार्थिनींना मारहाण.

वाहने जात राहिली, गर्दी मूकदर्शक बनून राहिली

  • रस्त्यावर विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन होत राहिले. आसपास वाहने व नागरिक जात राहिले, कुणीही मध्यस्थी केली नाही.
  • विद्यार्थिनी हात जोडून आरोपींकडे जाऊ देण्याची विनवणी करत राहिली. ती गयावया करत होती, ‘सोडून द्या, तुमचीच मुलगी आहे.’
  • आरोपींचे कृत्य पाहून एका नागरिकाने विरोध केला. त्याने तरुणांना खडसावले. यानंतर दोघांना तेथून निघण्याची संधी मिळाली.
  • गैरवर्तन थांबवण्याऐवजी आरोपी घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले. नंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला.
  • १९ सप्टेंबरची घटना, २१ ला व्हिडिओ व्हायरल; एसआयटी तपासात व्यग्
  • २० सप्टेंबर | व्हिडिओ प्रसार व्हिडिओ व्हायरल, आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात.
  • २१ सप्टेंबर | संध्या.३ ताब्यात तिघे ताब्यात. उर्वरितांचा शोध सुरू आहे.
  • २१ सप्टेंबर | दुपारी एसआयटी: एसडीपीओच्या नेतृत्वाखाली एसआयटी बनली. तपास सुरू.
  • २१ सप्टेंबर | एफआयआर: पोलिस पीडितेपर्यंत पोहोचले. जबाब नोंदवले. गुन्हा दाखल.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *