Mumbai Municipal Election Thackeray MNS Alliance BJP Criticism | देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट, हाच आमचा फॉर्म्युला: राज आणि उद्धव ठाकरे भावनात्मक मते मागतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला – Mumbai News



मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी युती केली आहे. यावरून महायुतीमधील घटक पक्षांनी विशेषतः भाजपचे जोरदार टीका केली आहे. आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य करत टी

.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनात्मक मते मागायची आहेत. महाराष्ट्रातील जनता विकासाला मत देते. राज ठाकरे ईव्हीएम मशीन, मतचोरीवर बोलले. पण ते काहीच चालत नसल्यामुळे आता असे बोलत आहेत. पंचवीस वर्ष तुमचा महापौर होता, मुख्यमंत्रीपद होते, त्यावेळेस तुम्ही काय केले? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्हाला मुंबईचा खरेच विकास करायचा असेल तर व्हीजन डॉक्युमेंट द्या. त्यांच्याकडे काहीही प्लॅन नाही. त्यांना फक्त भावनात्मक बोलायचे आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चंद्र सूर्य असतील तोपर्यंत त्यांना दिल्लीचे ऐकावे लागेल. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष आहे, पक्षाची शिस्त आहे. सर्वात मोठा पक्ष आहे. रस्त्यावरचा पक्ष थोडीच आहे. या पक्षाला एक भूमिका आहे. आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारी लोक आहोत. आतापर्यंत भाजपचया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय केंद्र सरकारने पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारचा निर्णय देवेंद्र फडणवीस पूर्ण करतात, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार मजबूत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र काम करतील. आम्ही समन्वय समितीत निर्णय घेतला, त्यावेळेस उदय सामंत हजर होते. पंधरा ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत, काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. तसेच लोक आम्हाला मत देतील. विरोधी पक्ष किंचित झालेला दिसेल, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *