Sanjay Shirsat Accuses AIMIM Inciting Communal Riots Chh Sambhajinagar | संजय शिरसाट यांचा MIM वर गंभीर आरोप: लोकांची माथी भडकावून शहरात जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमवर गंभीर आरोप केले आहेत. एमआयएम शहरात जातीय विष पसरवत असून, लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहे. यामुळे शहरात जातीय दंगल घडण्याची शक्यता असल्याचा इशारा शिरसाट यांनी दिला.

.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरणारे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संजय शिरसाट यांनी एमआयएमच्या जातीय प्रचारावर टीका केली. असदुद्दीन ओवेसी यांच्या शहरात आगमनाबद्दलच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ओवेसी कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका दिवसात संस्थानांवर कारवाई करून देशात एक नवा आदर्श निर्माण केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.

एमआयएमकडून आपल्यावर टीका केली जात असल्याने, आपणही त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे, असा सल्ला शिरसाट यांनी उपस्थित नेत्यांना दिला. त्यांच्या टीकेला आपल्याकडून योग्य प्रतिउत्तर मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी खासदार संदिपान भुमरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन प्रचार करण्याच्या सूचना दिल्या. तर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

हे ही वाचा…

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:आमदारकी असूनही नगरसेवकपदाचा हट्ट का? संभाजीनगरात पाणी-शौचालयांवरून महायुतीमधील तिन्ही पक्षांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे घमासान

शहराच्या विकासाचा आरसा दाखवणाऱ्या आणि नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देणाऱ्या दिव्य मराठी ॲपच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या खास मालिकेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये भेट दिली असता, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले. सविस्तर वाचा…

बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा:यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *