भाग्यनगर पोलीसांनी 4 चोरट्यांना पकडले;78 लाखांचा ऐवज जप्त; पोलीस कोठडी मंजुर

0
Bhagaynagar-4-Chor.jpg


नांदेड(प्रतिनिधी) -भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने चार चोरट्यांना पकडून 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चार चोरट्यांना न्यायालयाने —- दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या चार चोरट्याखांकडून पोलीसांनी 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा चोरीतील मुद्देमाल 44.5 तोळे सोन्याचे दागिणे आणि 171.4 तोळे चांदीचे दागिणे जप्त केले आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक संतोष तांबे, गुन्हे शाखचे पोलीस निरिक्षक महेश माळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार विशाल माळवे, सविता केळगंद्रे, विष्णुुकांत मुंडे, सुधाकर मलदौडे, राहुल लाठकर, राजीव घुले, नागनाथ, अदनान पठाण, अंकुश कांबळे, सायबर विभागाचे पोलीस उपनिरिक्षक मारोती चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप मेहनत घेवून सोहेल अब्दुल सत्तार (19) रा.जवाहरनगर नांदेड, प्रदीपकुमार विरेंद्र प्रसाद कौरी (19) रा.धनेगाव, बळीरामपूर नांदेड, अर्जुन पुरुषोत्तमराव मोरे (28) रा.मरघाट चौफाळा नांदेड, शेख नईम शेख मैनोद्दीन (22) रा.कैलासनगर नांदेड, आशा हरीशचंद्र तेलंग(56) रा. शाहुनगर नांदेड आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला शोधले. त्यातील विधीसंघर्षग्रस्त बालक वगळता सर्वांना अटक करण्यात आली आहे.
या पाच जणांमध्ये सोहेल अब्दुल सत्तार आणि प्रदीप कौरी तसेच विधी संघर्षग्रस्त बालक असे तिघे प्रत्यक्षात चोऱ्या करत होते आणि इतर मंडळी चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावत होते. तसेच चोरीची तयारी करीत होते. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 6 घरफोड्या, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोड्या आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देान घरफोड्या अशा 10 घरफोड्या यांनी केल्या आहेत. त्यांनी चोरलेल्या साहित्यामधील 44.5 तोळे वजनाचे सोन् याचे दाणिगे, 171.4 ताळे चांदीचे दागिणे, एक मारोती कार आणि तीन दुचाकी गाड्या असा 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आज या प्रकरणातील चार चोरट्यांना न्यायालयाने — दिवस अर्थात — एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.


Post Views: 272






वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks