[ads1]
- Marathi News
- National
- Nepal like Danger In Ladakh; Leakage From Lake, Scientists Monitoring, Size Of Glacier Lake Doubled, Preparation To Release Water If Pressure Increases
मनमीत46 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

हा छोटा ग्लेशियर तलाव वाटत असला, तरी त्याचा आकार ५ फुटबॉल मैदानांपेक्षा मोठा आहे. २५ वर्षांपूर्वी हा भाग बर्फाने आच्छादलेला होता.
लडाखमधील सर्वात मोठ्या द्रंग-द्रुंग ग्लेशियरच्या मुखावर तयार झालेल्या तलावातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. तलाव काही वर्षांत वेगाने वाढला आहे. अशा स्थितीत वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ झांस्करमध्ये ग्लेशियरजवळच कॅम्प करून यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. शास्त्रज्ञ तलावातील पाण्याचे प्रमाण, खोली आणि ग्लेशियर वितळण्याच्या वेगावर लक्ष ठेवून आहेत. पाणी वाढल्याने तलावावरील दबाव धोकादायक पातळीवर पोहोचल्यास अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचीही तयारी आहे.
नेपाळमधील अलीकडच्या आपत्तीनंतर हिमालयीन क्षेत्रातील संवेदनशील ग्लेशियर तलावांची निगराणी आणखी तीव्र करण्यात आली आहे. सुमारे २४ किमी लांब द्रंग-द्रुंग ग्लेशियर मागे हटल्याने त्याच्या मुखावर हा प्रो-ग्लेशियल तलाव तयार झाला आहे. २०१७ मध्ये याचे क्षेत्रफळ सुमारे १६.६२ हेक्टर होते, जे २०२३ मध्ये वाढून ३९.१ हेक्टर झाले. म्हणजेच केवळ सहा वर्षांत तलाव सुमारे १३५% विस्तारला. ग्लेशियोलॉजिस्ट डॉ. मनीष मेहता आणि त्यांची टीम तलावाची खोली आणि क्षेत्रफळ कोणत्या वेगाने बदलत आहे, याचा शोध घेत आहे.
भूतानमध्ये चालले होते ‘ऑपरेशन थोर्थोर्मी’
भूतानमध्ये थोर्थोर्मी ग्लेशियर तलावाचा धोका वाढल्यानंतर २००९ मध्ये पाणी नियंत्रित पद्धतीने काढण्यात आले होते. ही मोहीम तीन वर्षे चालली. याच धर्तीवर द्रंग-द्रुंगमध्येही पाणी काढण्याच्या पर्यायाचा अभ्यास केला जात आहे.
पाणी थेट डोडा नदीत, पाच हजार लोकांशी संबंध
तलावातून बाहेर पडणारे पाणी डोडा नदीत जाते. ते पुढे झांस्कर नदीत आणि नंतर सिंधू नदी प्रणालीत मिसळते. डोडा नदीचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये घर आणि सिंचनासाठी वापरले जाते. ५ हजार लोक याच्याशी जोडले आहेत.
अरुणाचल: ७ ग्लेशियर तलावांमुळे लष्करी तळ धोक्यात
दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील मागो भागात ७ ग्लेशियर तलाव धोकादायक श्रेणीत आहेत. यातून पाणी बाहेर पडल्यास लष्कर आणि आयटीबीपीचे तळही विळख्यात येऊ शकतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर अर्ली वॉर्निंग सिस्टिम तयार केली जात आहे.
२०१० नंतर तलाव तयार झाला, ग्लेशियर मागे हटले
२०१० नंतर ग्लेशियर मागे हटल्याने तयार झालेल्या खोल जागेत वितळलेल्या बर्फाचे पाणी साचू लागले आणि तलाव तयार झाला. १९७१ ते २०१७ दरम्यान ग्लेशियर १३.८४% ने कमी झाले आणि पुढचा भाग ९२५ मीटर मागे गेला.
[ads2]
















Leave a Reply