[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम – ३ अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. १ ते २१ सप्टेंबर २०२६ या तीन आठवड्यांच्या कालावधीत परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांमध्ये एकूण १,२२२ गुन्हे दाखल करून १,९८२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून १५,०५,२३,५८३ रुपयांचा म्हणजेच सुमारे १५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यांनुसार कारवाईचा तपशील:
- दारूबंदी कायदा: सर्वाधिक ७४६ गुन्हे दाखल; ७७५ आरोपींवर कारवाई करत ३५,२४,३७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
- मटका व जुगार: २०४ गुन्हे दाखल; ८२७ आरोपींवर कारवाई करून १,८३,३७,३२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
- गुटखा विरोधी कारवाई: २२ गुन्हे दाखल; ३९ आरोपींकडून १,२१,२३,८६० रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त.
- शस्त्र अधिनियम: २८ गुन्हे दाखल; ४३ आरोपींवर कारवाई करून १,४३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
- इतर अधिनियमांखालील केसेस: २२२ गुन्हे दाखल; २९८ आरोपींकडून ११,६३,९४,८१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
जिल्हा निहाय कारवायांचा थोडक्यात आढावा:
| जिल्हा | गुटखा कारवाई (रु.) | मटका/जुगार (रु.) | दारू (रु.) | शस्त्र अधिनियम (रु.) | इतर केसेस (रु.) |
|---|---|---|---|---|---|
| नांदेड | ५७,९६,९३६ | ३७,४७,८८५ | १०,१८,२८२ | ४२,९०० | ६,७०,५३,६०५ |
| परभणी | ४,७७,६८० | ३५,९८,०६० | ७,४८,५३२ | ९७,५०० | २,३१,८७,९०४ |
| हिंगोली | ३४,६१,९४९ | ४३,८७,२१५ | ८,०१,१३५ | २,८०० | १,२१,७१,६०३ |
| लातूर | २३,८७,२९५ | ६६,०४,१६५ | ९,५६,४३० | ० | १,३९,८१,७०७ |
विशेष पथकाच्या प्रमुख कारवाया:
विशेष मोहिमेदरम्यान खालील ठिकाणी मोठ्या कारवाया करण्यात आल्या:
१. परभणी जिल्हा: जिंतूर येथील दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट या क्लबवर विशेष पथकाची कारवाई.
२. हिंगोली जिल्हा: वसमत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टी गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड.
३. नांदेड जिल्हा: नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा व्यावसायिकांविरोधात मोठी कारवाई.
खबर हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन:
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकाची खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पाठवावी; माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Post Views: 125
[ads2]
















Leave a Reply