![]()
खान्देशच्या साहित्य विश्वाला स्त्री साहित्यिकांनी भरीव योगदान देत ते समृद्ध केले आहे, असे गौरवोद्गार धुळे येथील साहित्यिक व समीक्षक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी काढले. खान्देशातील स्त्री साहित्यिकांचे योगदान या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावर
.
जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळातर्फे आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनाचा मंगळवारी समारोप झाला. प्रा. बी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. जिल्हाभरातून आलेल्या कवींनी मोठ्या संख्येने आपल्या कविता सादर केल्या.
याप्रसंगी झालेल्या परिसंवादात डॉ. रमेश माने (कविता, धुळे), साहेबराव मोरे (कथा, चाळीसगाव),लतिका चौधरी (आत्मचरित्र, दोंडाईचा), अ. फ. भालेराव (कादंबरी) तसेच रमेश धनगर (बालसाहित्य, गिरड) यांनी खान्देशातील स्त्री साहित्यिकांच्या साहित्य प्रतिमेचा सखोल आढावा घेत नवोदित स्त्री साहित्यिकांनी लेखन क्षेत्रात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. आर. महाजन, सचिव गोरख सूर्यवंशी, विश्वस्त सुखदेव महाजन, रुपेश बिऱ्हाडे, नागनंदा मघाडे, पी. डी. पाटील यांच्यासह सर्व साहित्यिकांनी सहकार्य केले. दोन दिवसीय या साहित्य संमेलनाचा जिल्हाभरातल्या साहित्यिकांनी लाभ घेतला.
गझल गायन सत्राने उपस्थित मंत्रमुग्ध पहाडी आवाजातील तुकाराम ढिकले यांच्या गझल गायनाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. समारोपप्रसंगी काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
