![]()
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने अनेक ठिकाणी बाहेरून आलेल्या ‘आयारामां’ना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्य
.
भाजपच्या माध्यम प्रमुखपदाची जबाबदारी नुकतीच मिळालेल्या नवनाथ बन यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दीर्घकाळापासून पक्षाची बाजू मांडणाऱ्या केशव उपाध्ये यांना मात्र संधी मिळालेली नाही. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी उपाध्ये यांना चिमटा काढला आहे. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातील तीन सदस्यांना, तसेच विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना उमेदवारी मिळाल्याने निष्ठावंतांमध्ये सुरू असलेली धुसफूस अंधारे यांनी अधोरेखित केली आहे.
भाजपचे 9 तरुण प्रवक्ते रिंगणात!
दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपकडून 9 प्रवक्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुंबईतून नवनाथ बन, गणेश खंडकप, राणी द्विवेदी, नील सोमय्या, योगेश वर्मा, मकरंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यातून मृणाल पेंडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून कुणाल टिळक, नागपूरातून शिवानी दाणी यांना उमेदवारी मिळाली आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे.
आपल्या-आपल्या वॉर्डमध्ये ठोस, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करून दाखवण्याची क्षमता या सर्वांमध्ये आहे. या 9 तरुण प्रवक्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तरुणाईच्या बळावर, विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
