नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी येथील एका भांड्यांचे गोडाऊन फोडून तांबा-पितळाची भांडी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेला १००% मुद्देमाल (किंमत ४७,००० रुपये) जप्त केला आहे.
घटनेचा तपशील: १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुंडलवाडी येथील एका भांड्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तेथील तांबा-पितळाची भांडी चोरून नेली होती. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९३/२०२६, कलम ३३१(३), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि अटक: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तेलंगणा राज्यातील निझामाबाद परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. सायलू नागय्या बिंगी (वय ३८ वर्ष, रा. रुद्रूर, ता. निझामाबाद) २. पोशेट्टी गंगाराम ऊर्फ पोशेट्टी इडिबिडी (वय ४३ वर्ष, रा. रंगारगल्ली, बोधन, जि. निझामाबाद) ३. येनकवा कृष्णा अण्णा (वय ५१ वर्ष, रा. रंगारगल्ली, बोधन, जि. निझामाबाद) ४. गंगामणी सायलू बिंगी (वय ३३ वर्ष, रा. रुद्रूर, ता. निझामाबाद)
पोलीस पथक: ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (धर्माबाद) दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पाडली:
- सपोनि/ ज्ञानेश्वर शिंदे (प्रभारी अधिकारी, कुंडलवाडी पोलीस ठाणे)
- पोउपनि/ दत्तात्रय गिरी
- पोलीस अंमलदार: संतोष सेंगावार, अशोक धोटे, आनंद बोईडे, रामेश्वर पाटील
- महिला अंमलदार: अरुणा श्रीवास्तव
- होमगार्ड: हर्षवर्धन जाधव, अण्णाराव जाधव, सुनील रामभाऊ, साईदार काके
या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, तसेच चोरीचा माल कोठे विकला जात होता, याचा अधिक तपास कुंडलवाडी पोलीस करत आहेत.
Post Views: 31

