शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे शिवतीर्थावरील मेळावा हा केवळ परंपरेचा भाग नसून, शिवसेनेचा वारसा आणि पक्षाची राजकीय ताकद दाखवण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि आगामी राजकीय घडामोडींविषयी काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणात आज काय असू शकते? व्होट चोरीचा मुद्दा: ठाकरे गटाने तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. निवडणुकांमधील कथित गैरप्रकार, यावर ठाकरे जोरदार प्रहार करण्याची शक्यता आहे. दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न: राज्यात असलेली दुष्काळी परिस्थिती ठाकरे यांच्या भाषणाचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल: राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षितता आणि वाढती गुंडगिरी यावरून ठाकरे राज्य सरकारला धारेवर धरतील. काही वेळापूर्वी केलेली पोस्ट.. हेही वाचा.. 500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर षड्यंत्र उघडे पाडा: मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; हेक्टरी 1 लाख, संपूर्ण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही!
“मराठा समाजाने आता डोळे उघडून स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण्यांचे पक्ष आणि त्यांचे आमदार-खासदार वाढवण्यासाठी स्वतःचा बळी देणे आधी बंद करा. दुष्काळात शेतकरी हतबल झाला आहे, पिके जळून खाक झाली आहेत आणि सरकार अवघे 5,000 रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या 5,000 रुपयांसाठी शेतकऱ्याचे बँकेच्या फेऱ्या मारण्यात आणि प्रवासातच सर्व पैसे खर्च होणार; मग शेतकऱ्याच्या हातात काय उरणार? राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. यासाठी सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठा लढा उभारणार,” असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%