![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपले बालेकिल्ले शाबूत राखण्यासाठी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असतानाच, आता
.
शिवसेना उबाठा पक्षातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर या दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने दहिसरमध्ये एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून भाजप मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खुद्द घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना केले आहे.
मलबार हिलमध्ये चार उमेदवारांची नावे जाहीर
दक्षिण मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजपने चार जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अजय पाटील (वॉर्ड 214), संतोष ढाले (वॉर्ड 215), स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड 218) आणि सन्नी सानप (वॉर्ड 219) हे चारही उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे. भाजपने अद्याप अधिकृतरीत्या संपूर्ण शहराची यादी प्रसिद्ध केली नसली, तरी स्थानिक पातळीवर उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे रिंगणात उतरत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचीही यादी कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अधिकृत उमेदवारी आणि ‘एबी’ फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्ष कार्यालयांबाहेर गर्दी केली आहे. येत्या 24 ते 48 तासांत मुंबईतील जागावाटपाचे आणि उमेदवारांचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
